बांगलादेशात इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्याने धर्मांधांकडून हिंदु नेत्याला मारहाण

ढाका (बांगलादेश) – इफ्तारच्या मेजवानीत सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांती गुहा यांना धर्मांधांकडून ३० एप्रिल या दिवशी येथील पटिया उपजिल्ह्यातील हैदगांवातील गौचिया सामुदायिक केंद्रासमोर एका झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. श्री. गुहा पूर्वी अवामी लीग पक्षाचे स्थानिक अध्यक्ष होते. स्थानिक सरकारी अधिकार्‍यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली.

याविषयीची माहिती ‘वॉइस ऑफ बांग्लादेश हिंदू७१’ नावाच्या ट्विटर खात्यावर देण्यात आली असून श्री. गुहा यांचे झाडाला बांधण्यात आलेले छायाचित्रही प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे, ‘इफ्तार मेजवानीत सहभागी न झाल्याने अवामी लीग पक्षाचा स्थानिक नेता महंमद जसीम याने श्री. गुहा यांना मारहाण केली.’

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू ! भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्‍या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !