उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

उजवीकडे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत

डेहराडून (उत्तराखंड) – वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिली.

रावत पुढे म्हणाले की, देशात लागू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय इतिहास आणि परंपरा यांवर आधारित शैक्षिणिक धोरण सिद्ध केले जाणार आहे. असे करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरणार आहे. या अभ्यासक्रमात स्थानिक भाषांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशातील प्रत्येक राज्यातील शालेय अभ्यासक्रमांत हिंदु धर्मग्रंथ शिकवले पाहिजेत !