माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

त्रिपुरातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी त्यागपत्र दिल्यानंतर त्रिपुरातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांनी १५ मे या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला आग : आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !

साधनेचे महत्त्व

‘राजकीय पक्ष  ‘हे  देऊ,  ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’

‘पी.एफ.आय.’च्या २ नेत्यांना अटक होण्याची शक्यता !

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेच्या दोन नेत्यांविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग (आर्थिक अपव्यवहार) प्रतिबंधक कायदा, २००२’च्या तरतुदींखाली लक्ष्मणपुरीच्या विशेष न्यायालयासमोर गुन्हा नोंदवला आहे.

चिनी नागरिकांवरील आक्रमणांमुळे पाकमध्ये बलुची विद्यार्थ्यांचा छळ !

‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’ या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ दशकांत ६ सहस्रांहून अधिक बलुची लोकांचे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २००९ पासून आतापर्यंत १ सहस्र ४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत.

उत्तरप्रदेशात आमीरकडून शिक्षिकेवर बलात्कार !

अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

इमामाचा स्वतःच्या ३२ वर्षांहून लहान पत्नीला तलाक !

‘स्त्रीमुक्ती स्वातंत्र्य’ अथवा ‘स्त्री-पुरुष समानता’ अशा गोंडस नावांखाली  केरळमधील शबरीमाला मंदिरातील शेकडो वर्षांच्या दैवी परंपरेस विरोध करणारी  पुरो(अधो)गामी टोळी आता गप्प का ? कि मुसलमान पुरुषांच्या अधिकारांसमोर मुसलमान महिला खिजगणतीत नाहीत, असे त्यांना म्हणायचे आहे ?

नागपूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त सहभाग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये २०० हून अधिक साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.