पाळधी (जिल्‍हा जळगाव) येथील उद्रेक प्रकरणात ७ जणांना अटक !

श्री. गुलाबराव पाटील

पाळधी (जिल्‍हा जळगाव) – ३१ डिसेंबरच्‍या रात्री पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्‍या कुटुंबियांच्‍या वाहनाला जाण्‍यासाठी काही धर्मांधांनी रस्‍ता दिला नाही. यानंतर झालेल्‍या उद्रेकातून जाळपोळ झाली होती. या प्रकरणी एका चप्‍पल विक्रेतेच्‍या तक्रारीवरून २५ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. यातील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्‍यात आली आहे.

अन्‍वेषणातून वस्‍तूस्‍थिती समोर येईल ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री

३१ डिसेंबरला मी गडावर असल्‍याने पाळधी गावात नव्‍हतो. सध्‍या गावात शांतता असून पोलिसांना अन्‍वेषण करून वस्‍तूस्‍थिती समोर आणण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत. याचसमवेत गावातील वातावरण पूर्वपदावर आणण्‍यासाठीही सूचना केल्‍या आहेत.