लोणावळा येथील एकविरा गडावरील घटना !
लोणावळा (जिल्हा पुणे) – येथील एकविरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली. त्यामुळे मधमाशांनी भाविकांवर आक्रमण केले. यामुळे अनेकजण घायाळ झाले असून गडावर गोंधळ निर्माण झाला. कुलाबा (मुंबई) येथून देवीची पालखी गडावर पोचली. पालखीत सहभागी भाविकांनी मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके लावले. फटाक्यांच्या आवाजाने आणि धुरामुळे मंदिर परिसरातील मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का बसला. त्यामुळे मधमाशांनी भाविकांवर आक्रमण केले.
‘गडावर फटाके वाजवण्यास बंदी असतांनाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात’, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले. (बंदी असूनही फटाके वाजवले जाणे, हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयश ! – संपादक)
संपादकीय भूमिका :धर्मशिक्षणाच्या अभावामुळे भाविक देवतांच्या उत्सवातही फटाके वाजवतात. त्यामुळे अन्य भाविकांच्या उपासनेत तर अडथळा होतोच, त्यासमवेतच अशा प्रकारच्या दुर्घटनाही घडतात ! |