मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्‍ही बोगदे २६ जानेवारीपासून चालू होणार !

४५ मिनिटांचा प्रवास ८ मिनिटांत

कशेडी बोगदा

मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्‍ही बोगदे २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. तेथील विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकादायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्‍या-जाण्‍यासाठी दोन स्‍वतंत्र बोगदे केले आहेत. या महामार्गावर बोगद्याच्‍या परिसरात ४५ मिनिटांचा असणारा प्रवास ८ मिनिटांत होणार आहे.