श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला आग : आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

जम्मू – येथील श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला १३ मे या दिवशी अचानक आग लागली. ही बस कटरा येथून जम्मूच्या दिशेने जात होती. यात आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गांभीर घायाळ झाले. या घटनेमागे आतंकवादी आक्रमण असल्याच्या शक्यतेने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात  येत आहे. या बसला ‘स्टिकी बाँब’च्या (हा बाँब संबंधित ठिकाणी चिटकवला जातो) साहाय्याने आतंकवाद्यांनी आग लावल्याचे सांगितले जात आहे. याचे दायित्व ‘जम्मू-काश्मीर फ्रिडम फायटर्स’ या संघटनेने घेतले आहे.
याविषयी जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले की, आम्हाला प्राथमिक चौकशीत स्फोटकांसारखे काहीही सापडले नाही; मात्र बसमधील लोक आणि घटनास्थळाजवळील लोक यांनी येथे स्फोटाचा आवाज ऐकला आहे.

संपादकीय भूमिका 

  • जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !