धर्मांतराच्या अंतहीन क्लृप्त्या !

इंग्रज ख्रिस्ती प्रथांची देण आपल्याला देऊन गेले आणि आपण त्याच्या आधीन झाल्याने त्यांना धर्मपरिवर्तन करणे सोपे जात आहे. हिंदूंनी स्वधर्माचे महत्त्व जाणून धर्माचरण केले, तर आणि तरच त्यांचे ख्रिस्तीकरण थांबू शकते, हे हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे !

भंडारा येथे विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त !

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी !

अहेरी (जिल्हा गडचिरोली) येथे स्वतःवर गोळ्या झाडून सैनिकाची आत्महत्या !

सैनिकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यासाठी साधना आणि अध्यात्म यांची जोड देणेच महत्त्वाचे आहे !

रिक्शाचालकांकडून लूट !

वर्ष २०१२ नंतर राज्यात सर्वच रिक्शांना ‘डिजिटल मीटर’ची सक्ती करण्यात आली. यानंतर अनेक शहरांमध्ये प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता येईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या तरी हे चित्र उलटेच पहायला मिळत आहे.

संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या सभेची ठरलेल्या जागीच जय्यत सिद्धता !

२४ एप्रिल या दिवशी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील व्यासपिठाची मनसैनिकांकडून विधीवत् पूजा करण्यात आली. त्यानंतर आता सभेसाठी सिद्धता करण्यात येत आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी प्रवचन !

याचा लाभ ३५ औषधे विक्रेते आणि ५ महिला यांनी घेतला. प्रवचन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले. अनेकांनी ‘हा विषय प्रत्येक मासात आम्हाला सांगा’, असे मत व्यक्त केले.

पाकमध्येच नव्हे, तर भारतातही बहुतांश ठिकाणी असेच आहे !

पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

धर्म आणि माध्यमे यांचा भारताच्या विरोधात होणारा धोकादायक वापर !

संपूर्ण विश्वात केवळ भारतच देश असा आहे, जेथील काही माध्यमे आणि फुटीरतावादी लोक आपल्याच देशाला खाली पाडण्यात गुंतलेले आहेत. हे लोक माध्यमे आणि धर्म यांचे ‘कॉकटेल’ सिद्ध करून आपल्याच देशाला कमजोर करत आहेत.

राज्यातील १४२ मदरशांसाठी ५ कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान !

काही मदरशांमध्ये शस्त्रे आढळणे, अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार होणे यांसारखे प्रकार झाल्याच्या घटना अधूनमधून पुढे येत असतात. ‘अशा मदरशांना निधी मिळत असेल, तर राष्ट्रविघातक शक्तींना चालना देण्यासारखेच आहे’, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? 

मंदिरांतून हिंदूंना आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले गेले पाहिजे ! – परमात्माजी महाराज, श्रीक्षेत्र द्वारापूर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु

प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा.