क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.

चीनच्या बीजिंग आणि शांघाय शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

चीनच्या शांघाय शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे ५१ मृत्यू झाल्याची नोंद झाली, तर बीजिंगमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराच्या उच्चभ्रू भागात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत.

उत्तरप्रदेशात १७ सहस्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून झाला !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे काढण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज न्यून करण्यात आला आहे

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणाची तालिबानकडून सुरक्षा परिषदेत तक्रार

कालपर्यंत पाकच्या साहाय्याने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणाऱ्या तालिबानला आता पाकचा त्रास होत असेल, तर ती पाकला नियतीने दिलेली शिक्षाच होय !

रशियाच्या २ तेलसाठ्यांवर युक्रेनचे क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

युक्रेनच्या डोनबास शहरावर आक्रमण करण्यासाठी रशिया ज्या ब्रान्स्क शहरातून रसद मिळवत होता, त्या शहरावर युक्रेनने क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यात ब्रान्स्कमधील २ तेलसाठ्यांना आग लागली.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितांनाचा व्हिडिओ ट्वीट !

‘खार पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी अत्यंत हीन वागणूक दिली’, असा आरोप अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी केला होता.

संभाजीनगर येथे जमावबंदी नाही, प्रसारमाध्यमांमधील वृत्त चुकीचे ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

‘शहरात आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे’, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांवर आले आहे; मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून शहरात कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही.

चांदिवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द !

या अहवालामध्ये अनिल देशमुख यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले; मात्र सरकारकडून याविषयीची अधिकृत भूमिका अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही.

पत्नी आणि मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी छोट्या ध्वनीक्षेपकावर गाणे लावण्यामुळे गुन्हा नोंद करणे हे षड्यंत्रच ! – किशोर मलकुनाईक, पोलीस उपनिरीक्षक

किशोर मलकुनाईक हे ज्या इमारतीत रहातात, त्याच्या समोरच एक मशीदही आहे. २३ एप्रिल या दिवशी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मलकुनाईक यांनी घरात मेजवानीचे आयोजन केले होते.

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करावे ! – अभिजीत पोलके, हिंदु जनजागृती समिती

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !