गडचिरोली – जिल्ह्यातील अहेरी येथे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री अमरिशराव आत्राम यांच्या बंगल्यावर कर्तव्यावर असलेले सैनिक हितेश भाईसारे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. भाईसारे हे प्राणहिता उपपोलीस मुख्यालयात कार्यरत होते. २४ एप्रिलच्या रात्रीपासून आत्राम यांच्या बंगल्यावर ते कर्तव्यावर होते. २५ एप्रिल या दिवशी सकाळी १०.३० वाजता स्वतःच्या बंदुकीने गोळ्या घालून भाईसारे यांनी आत्महत्या केली. ‘कौटुंबिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली आहे’, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वी अशा ३-४ घटना गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या आहेत.
संपादकीय भूमिकासैनिकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यासाठी साधना आणि अध्यात्म यांची जोड देणेच महत्त्वाचे आहे ! |