‘आज आपल्याला ३ महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पहिले सूत्र आहे, ते म्हणजे काश्मीरच्या सोपोर भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या खंदकावर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या महिलेने बुरखा घातला होता. दुसरी गोष्ट सुरक्षादलाने श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ज्या २ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. त्यातील एक आतंकवादी काश्मीरमधील एका वृत्तवाहिनीचा मुख्य संपादक होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वत:ला आंतरराष्ट्रीय पत्रकार समजणाऱ्या महिलेला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले. त्यामुळे संपूर्ण देशात कल्लोळ झाला आणि भारतीय माध्यमांनी या वृत्ताला मुख्य पानावर स्थान दिले. ‘चॅरिटी’च्या नावावर लोकांकडून वर्गणी गोळा करून ती स्वत:च्या बँक खात्यात जमा केल्याचा या महिलेवर आरोप आहे. या तिन्ही घटना भारताची सद्यःस्थिती दर्शवत आहेत. या घटनांवरून देशात धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. यासंदर्भातील विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.
१. जम्मू-काश्मीरमध्ये एका बुरखाधारी महिलेने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या खंदकावर पेट्रोल बॉम्ब फेकणे आणि त्यातून आतंकवादाला धर्म असल्याचे स्पष्ट होणे
१ अ. पेट्रोल बॉम्ब फेकणारी महिला नसून पुरुष असल्याचा खोटा अपप्रकार केला जाणे, कालांतराने ती महिलाच असल्याचे उघड होणे आणि घटनेच्या चित्रफीतीवरून महिला पेट्रोल बॉम्ब फेकण्यात तरबेज असल्याचे दिसणे : पहिली घटना काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातील सुपूर भागातील आहे. एका महिलेने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या खंदकावर पेट्रोल बॉम्ब फेकून पलायन केले. महिलेने बुरखा घातला होता. या घटनेचे वृत्त देतांना काही माध्यमांनी सांगितले, ‘बुरखा घातलेली महिला नसून तो पुरुष आतंकवादी होता.’ या वृत्तावर अनेकांनी विश्वासही ठेवला. यापुढे ‘या घटनेला बुरख्याशी जोडून पाहता कामा नये’, असेही सांगण्यात येऊ लागले. सुदैवाने काही घंट्यांतच हा खोटा अपप्रकार असल्याचे उघड झाले. ‘बुरख्याच्या आत पुरुष नाही, तर एक महिला होती’, असे जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनीच स्पष्ट केले. आता या महिलेची ओळख पटली असून तिला पकडण्याची शोधमोहीम चालू आहे. ही महिला ‘लष्कर-ए-तोयबा’ची ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर’ असू शकते. ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर’ म्हणजे आतंकवाद्यांना साहाय्य करणारे आणि आवश्यकता पडली, तर आक्रमणही करू शकणारे स्थानिक नागरिक ! या घटनेच्या चित्रफीतीवरून ‘ही महिला पेट्रोल बॉम्ब फेकण्यात तरबेज होती’, असे दिसून येते.
१ आ. महिलेने बुरख्याच्या आडून आक्रमण करणे : भारतात एका विशेष विचारसरणीचे लोक, कथित विचारवंत, उदारमतवादी आणि माध्यमांचा एक वर्ग असे म्हणतो की, आतंकवादाला धर्माशी जोडता कामा नये. ही महिला बुरख्याच्या आडून आक्रमण करत होती. भारतीय सुरक्षा दलासमोर ती आतंकवादी आहे कि सामान्य नागरिक ? हे ओळखण्यासाठी ना वेळ होता, ना संधी होती !
१ इ. आफ्रिकेत बुरख्याआडून करण्यात आलेल्या आक्रमणांनंतर तेथे सरकारने बुरखा परिधान करण्यावरच प्रतिबंध घालणे; मात्र भारतात तसे करणे अशक्यप्राय असणे : बुरख्याच्या आडून यापूर्वीही अनेकदा आक्रमणे झाली आहेत. २१ जुलै २०१५ या दिवशी आफ्रिकेतील कॅमरून देशामध्ये २ महिलांनी केलेल्या आत्मघातकी आक्रमणात १३ लोकांचा जीव गेला होता. त्या दोघीही बुरखा घालून आल्या होत्या. वर्ष २०१५ मध्ये आफ्रिकेतीलच चाड देशात आतंकवाद्यांनी आत्मघातकी आक्रमणात ३३ लोकांची हत्या केली. तेही बुरखा घालूनच होते. या आक्रमणानंतर तेथील सरकारने बुरखा परिधान करण्यावरच प्रतिबंध घातला होता. अशाच प्रकारची घटना भारतातही घडली आहे; पण भारतात बुरख्यावर प्रतिबंध घालण्याची आपण कल्पना तरी करू शकतो का ? या देशात असे करणे अशक्यप्राय आहे. असा कुणी प्रयत्नही केला, तरी सर्वत्र हलकल्लोळ माजेल.
१ ई. जर आतंकवादाचा धर्म नसतो, तर आतंकवादी आक्रमणांमध्ये बुरखा कुठून येतो ? : अमेरिकेतील एका अभ्यासानुसार आत्मघातकी आक्रमणासाठी बुरख्याचा सर्वाधिक वापर केला जातो; कारण बुरख्यामुळे शरिरावर बांधलेला दारूगोळा ओळखणे कठीण असते. त्यामुळेच वर्ष २०१६ ते वर्ष २०२० या कालावधीत जेवढी आत्मघातकी आक्रमणे झाली, त्यातील प्रत्येक पाचव्या घटनेत आतंकवाद्यांनी बुरखाच घातला होता. विशेषत: यातील ९८ टक्के आक्रमणे धर्मविशेष लोकांनीच केलेली होती. विचार करा, जर आतंकवादाचा धर्म नसतो, तर आतंकवादाला आक्रमणांमध्ये बुरखा कुठून येतो ? आणि त्याचा प्रवेश कसा होतो ?
२. जम्मू-काश्मीरमध्ये एका वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाने पत्रकारितेच्या आडून आतंकवादी कारवायांद्वारे काश्मीरला अस्थिर करणे
पोलिसांना मिळालेल्या सूचनेनुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी एका संयुक्त मोहिमेच्या अंतर्गत २ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. जेव्हा या आतंकवाद्यांच्या सामानाची झडती घेतली गेली, तेव्हा त्यातील रईस भट या आतंकवाद्याकडे ‘प्रेस’चे ओळखपत्र आढळून आले होते. सुरक्षादलाच्या मते, रईस भट हा काही दिवसांपूर्वी ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये भरती झाला होता आणि पत्रकाराच्या वेशात रहात होता. तो एका स्थानिक वृत्तवाहिनीचा मुख्य संपादक होता. त्यामुळे त्याचा सर्वत्र वावर असेल. ही किती धक्कादायक गोष्ट आहे ! आता बुरखा आणि माध्यमे यांचा नवीन ‘कॉकटेल’ (दोन पेयांपासून बनलेला तिसरा पदार्थ) बनला आहे. त्यांचा देश तोडण्यासाठी वापर होत आहे. हा आतंकवादी होता आणि पत्रकार बनून काश्मीरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता.
३. भारतातील तथाकथित पत्रकारांनी देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातूनच ‘त्यांना पत्रकार कि गुन्हेगार म्हणावे ?’, असा प्रश्न निर्माण होणे
भारतात अनेक तथाकथित पत्रकार आहेत. त्यांचे कामच देशाला दिवसरात्र कमकुवत करणे, हे आहे. यातील एका महिला पत्रकाराला नुकतेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर अडवले. त्यामुळे भारतात कल्लोळ माजला. ही महिला पत्रकार ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘टाइम’ अशी नियतकालिके, तसेच ‘द गार्डियन’ या मासिकात लिखाण करते. ती ब्रिटनमध्ये ‘इंटिमिडेशन ऑफ जर्नलिस्ट’, म्हणजे ‘पत्रकारांना देण्यात येत असलेल्या धमक्या’ या विषयावर बोलण्यासाठी जात होती. ‘तिने ‘चॅरिटी’च्या नावावर कोट्यवधी रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यानंतर त्या पैशाचा योग्य ठिकाणी वापर न करता त्याची ‘मुदत ठेव’ (फिक्स्ड डिपॉझिट) करून स्वत:च्या आणि वडिलांच्या खात्यात ते जमा केले’, असा ‘ईडी’चा आरोप आहे. मग हिला पत्रकार कि गुन्हेगार समजले पाहिजे ?
आपल्या देशातील बहुतांश लोक हिला पत्रकार समजतात. जेव्हा ही पत्रकार ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ यांसारख्या मोठमोठ्या पाश्चात्त्य माध्यमांमध्ये लेख लिहिते, तेव्हा ती भारताच्या विरोधात विष ओकण्याचेच काम करत असते. या मोठ्या माध्यमांनाही पैशांसाठी भारतात राहून भारताच्याच विरोधात विष ओकणारे लोक हवे असतात आणि त्यांना ते पत्रकार बनवतात.
४. भारतावर युक्रेनसारखे आक्रमण झाले असते, तर सरकारला विरोधी पक्ष, कथित विचारवंत आणि माध्यमे यांच्याशीच पहिली लढाई लढावी लागली असती !
भारतात काही देशविरोधी शक्ती अतिशय प्रबळ झाल्या आहेत. त्या भारतात राहून भारतालाच अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काम धर्म आणि माध्यमे यांद्वारे होत आहे. आज युक्रेनच्या विरोधात युद्ध लढतांना रशियाला बरेच दिवस झाले आहेत. इतक्या दिवसांमध्ये युक्रेनचे लोक, स्थानिक आणि पाश्चात्त्य माध्यमे यांनी युक्रेनच्या सरकारवर एकही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांनी युक्रेनच्या सरकारला एकदाही विचारले नाही की, त्यांनी युद्धाची पूर्वसिद्धता का करून ठेवली नव्हती ? सरकार एवढे दिवस काय करत होते ? युक्रेनच्या राष्ट्रपतींनी चुकीचे निर्णय का घेतले ? सरकारने एवढ्या लोकांना युद्धात का झोकून दिले ? एकानेही त्यांच्या राष्ट्रपतीकडे बोट दाखवले नाही. पाश्चात्त्य माध्यमे तर युक्रेनच्या सरकारचे सतत कौतुक करत असतात. ते ‘रशियाने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन एक खलनायक आहेत’, असे चित्र रंगवत असतात. युक्रेनचे नागरिक, त्यांची माध्यमे आणि पाश्चात्त्य माध्यमे सर्वकाही युक्रेनच्या समवेत आहेत; परंतु देव ना करो, जर युक्रेनच्या ठिकाणी भारत असता आणि भारतावर असे आक्रमण झाले असते, तर भारताला पहिली लढाई शत्रूसैन्याशी नाही, तर आपल्याच देशातील माध्यमांशी लढावी लागली असती. विरोधी पक्ष, कथित विचारवंत आणि माध्यमे यांनी एकत्र येऊन सतत भारताचे सरकार अन् सैन्य यांवर प्रश्न उपस्थित केले असते. त्यात धर्माचे काही ठेकेदारही मिसळले असते. त्यानंतर सर्व जण आपल्याच सैन्याचा पराभव करण्यात मग्न झाले असते. त्यांनी आक्रमण करणाऱ्या देशाचे कौतुकही केले असते आणि म्हटले असते, ‘तुमची कोणतीही चूक नाही, सर्व चूक नरेंद्र मोदी यांचीच आहे !’
५. काश्मीरमधील बुरखा आणि माध्यमे यांच्या ‘कॉकटेल’ची व्याप्ती भारताच्या अन्य राज्यांतही वाढण्याची शक्यता असल्याने लोकांनी जागृत होणे आवश्यक !
संपूर्ण विश्वात केवळ भारतच देश असा आहे, जेथील काही माध्यमे आणि फुटीरतावादी लोक आपल्याच देशाला खाली पाडण्यात गुंतलेले आहेत. हे लोक माध्यमे आणि धर्म यांचे ‘कॉकटेल’ सिद्ध करून आपल्याच देशाला कमजोर करत आहेत. त्यामुळे माध्यमे आणि धर्म यांच्या ‘कॉकटेल’पासून आपल्याला सांभाळून राहावे लागेल. आपल्याला बुरखा आणि माध्यमे यांचे काश्मीरमध्ये जे ‘कॉकटेल’ पहायला मिळाले आहे, ते पुढे कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल, केरळ, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्येही पहायला मिळू शकते. याची व्याप्ती पुढेही वाढू शकते. त्यामुळे लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे.
(साभार : झी न्यूजच्या ‘डीएन्ए’चा लेख)