जसे धर्मांध मुसलमान काही ना काही निमित्त शोधून हिंदूंवर आक्रमण करत असतात, तसेच ख्रिस्तीही हिंदूंना ख्रिस्ती बनवण्यासाठी सातत्याने अनेकविध क्लृप्त्या शोधून काढत असतात. त्यासाठी कधी ते येशूला ध्यानमुद्रेत दाखवतात, तर कधी पाद्र्यांना भगवे कपडे घालायला सांगतात, कधी संस्कृत श्लोक वाचण्याचे नाटक करतात, तर कधी येशूची महती सांगणाऱ्या विविध पुस्तकांचे वितरण करतात. कधी प्रार्थनेने रुग्ण बरा करण्याचे ढोंग रचतात, तर कधी तेल किंवा पाणी देऊन हिंदूंना फसवतात. अशाच प्रकारे कॉन्व्हेंट शाळांमधून बाहेर पडलेल्या लक्षावधी हिंदु विद्यार्थ्यांचे ख्रिस्तीकरण करून त्यांना ‘जन्महिंदू’ ओळख रहाण्यापर्यंत मर्यादित बनवण्यात ख्रिस्ती संस्था मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या ‘सारा भारत ख्रिस्तमय करण्या’च्या वल्गनेला त्यांनी चांगलाच हातभार लावला आहे. गेल्या काही दशकांपासून कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु विद्यार्थ्यांवर विविध माध्यमांतून केल्या जाणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना आवाज उठवू लागल्या; तरीही ख्रिस्ती नन अन् शिक्षक त्यांचे शाळांच्या माध्यमातून होणारे धर्मप्रसाराचे कार्य यत्किंचितही थांबवायला सिद्ध नाहीत. हिंदु विद्यार्थिनींना मेंदी लावल्यास किंवा बांगड्या घातल्यास, तसेच हिंदु विद्यार्थ्यांनी टिळा लावल्यास शिक्षा करणे किंवा मारणे, ख्रिस्ती प्रार्थना म्हणणे सक्तीचे असणे आदी प्रकार येथे नित्याचे असतांना कर्नाटकातील बेंगळुरूमधील ‘क्लॅरेन्स हायस्कूल’ने ‘बायबल’ शाळेत आणणे सक्तीचे करून या सर्वांवर कडी केली आहे.
ख्रिस्त्यांना कायद्याचे भय नाही !
कर्नाटकसारख्या धर्मांतरविरोधी कायदा येऊ घातलेल्या भाजपशासित प्रदेशात आणि ज्या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ सक्रीयतेने कार्यरत आहेत, त्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विद्यार्थ्यांना ‘बायबल’ आणण्यास सांगण्याची सक्ती उघड उघड होते, तिथे भारतभर ख्रिस्त्यांनी किती निर्धास्तपणे छुपी आणि उघड धर्मांतरे करण्याचा कहर केला असेल, याची कल्पना येते. कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ख्रिस्त्यांचे हे आडून आडून हिंदूंचे मनःपरिवर्तन करून धर्मांतर करण्याचे प्रयत्न कायद्याच्या तांत्रिक व्याप्तीमध्ये कशा प्रकारे बसतात, ते पहावे लागेल. ख्रिस्ती त्यांचे अशा प्रकारचे धर्मांतराचे प्रयत्न चालूच ठेवत असतील, तर त्या प्रयत्नांना कायद्याच्या चौकटीत कसे घालता येईल, हे प्रशासन आणि शासन यांना आव्हान ठरेल; परंतु येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ख्रिस्त्यांना धर्मांतरविरोधी कायदा येऊ घातला असूनही काहीच भय वाटत नाही. ख्रिस्त्यांना धर्मांतर करत असल्याविषयी कडक शिक्षा होत नसल्यानेच त्यांच्या धर्मांतरासाठी विविध क्लृप्त्या काढण्ो चालूच आहे. कर्नाटकातील या उदाहरणांवरून देशभर हा कायदा करून या कायद्याची कार्यवाही किती कडक केली पाहिजे, हे लक्षात येते.
तमिळनाडूतील ख्रिस्त्यांच्या धर्मांतराचे डाव !
धर्मांतरित ख्रिस्ती त्यांचे हिंदु नाव कायम ठेवून बिनदिक्कतपणे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असतात. हिंदु नावामुळे हिंदू फसतात आणि त्यांच्या प्रसारतंत्राला बळी पडतात. तिरुपती मंदिरावर ख्रिस्त्यांनी विविध माध्यमांतून एवढे मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे की, उद्या ‘तिरुपती बालाजी हा येशूचा अवतार आहे’, असे म्हणण्यास ते कमी करणार नाहीत. तिरुमला तिरुपती देवस्थानम्च्या न्यासावर अनेक ख्रिस्त्यांचा भरणा झाला आहे. वर्ष २०१२ आणि वर्ष २०१८ मध्ये धर्मांतर करणाऱ्या सदस्यांना कारागृहात पाठवण्यात आले होते. तरीही सध्या तिरुपती देवस्थानच्या न्यासात अन्य धर्मियांना न घेण्याचा कायदा तोडून त्याची ‘ऐशी कि तैशी’ करण्यात आली आहे. तेथील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात चर्च उभी करण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. ख्रिस्ती देशात हिंदु धर्माचा डंका अभिमानाने मिरवणारे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असलेल्या कन्याकुमारीत ४६ टक्क्यांहून अधिक ख्रिस्ती जनता आहे आणि जिल्ह्यात ४०० चर्च आहेत. तमिळनाडूमध्ये शाळांतून ‘येशूची पूजा केल्यावर अधिक गुण मिळतील’, असे विद्यार्थ्यांवर बिंबवण्यात येत असल्याचे एका वृत्तवाहिनीने उघड केले.
हिंदूंच्या पुढच्या पिढ्या ख्रिस्ताळलेल्या बनवण्याचे षड्यंत्र !
कर्नाटक काय किंवा तमिळनाडू काय पूर्ण देशभरच विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर ख्रिस्ती धर्माचे ‘(कु)संस्कार’ करणे ख्रिस्त्यांना सोपे आणि परिणामकारक वाटत असणार, असे लक्षात येते. कर्नाटक येथे आता पालक आणि विद्यार्थी यांची दिशाभूल करून त्यांना एकप्रकारे ख्रिस्ती बायबल वाचायला भाग पाडत गेल्यास कालांतराने ते विद्यार्थी ‘बायबलवरच श्रद्धा ठेवणारे ख्रिस्ती होतील’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. आजही देशभर कॉन्व्हेंटमधून बाहेर पडलेल्या पिढ्यांपैकी बहुतांश मुले ही इंग्रजाळलेली झाल्याचे पहायला मिळतेच. हीच पिढी पुढे तथाकथित ‘सर्वधर्मसमभावी’ म्हणून समाजात वावरत असते आणि नंतर अप्रत्यक्षरित्या हिंदुविरोधी अन् त्यामुळे काही वेळा राष्ट्रविरोधीही बनते. हिंदूंच्या पुढच्या पिढ्या ख्रिस्ताळलेल्या बनवण्याचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे.
हिंदूंनो, धर्माचरणाचे महत्त्व लक्षात घ्या !
गेल्या शतकापासून हिंदूंचा पेहराव, केशभूषा, वेशभूषा, खाण्या-पिण्याच्या, आहार-विहाराच्या पद्धती आदी ख्रिस्ती संस्कृतीप्रमाणे होत आता त्याचा उच्चांक गाठला गेला आहे. अनेक हिंदु महिलांनी कुंकू लावण्यासारखी अत्यंत मंगलमय आणि पवित्र गोष्ट सोडून दिली आहे किंवा प्रासंगिक केली आहे. हिंदूंनी त्यांच्या रितीरिवाजांचे पारंपरिक धर्माधिष्ठित रूप पालटून टाकले आहे. काही जण चमच्याविना जेवणे ही कल्पनाही करू शकत नाहीत, तर काही जण मद्याचा पेग रिचवल्याविना निद्राधीन होत नाहीत. इंग्रज ख्रिस्ती प्रथांची देण आपल्याला देऊन गेले आणि आपण त्याच्या आधीन झाल्याने त्यांना धर्मपरिवर्तन करणे सोपे जात आहे. हिंदूंनी स्वधर्माचे महत्त्व जाणून धर्माचरण केले, तर आणि तरच त्यांचे ख्रिस्तीकरण थांबू शकते, हे हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे !
• ख्रिस्त्यांचे धर्मांतराचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी धर्माधिष्ठित होणे आवश्यक !• हिंदूंच्या भावी पिढीला ख्रिस्तीमय करण्याचे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र कायद्याद्वारे हाणून पाडा ! |