महाविद्यालयाने हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस बसण्याची अनुमती नाकारली !

कर्नाटकातील हिजाब वादाचे प्रकरण

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास स्पष्ट नकार

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोक आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार देणार्‍या अशा धर्मांध विद्यार्थिनींच्या संदर्भात महाविद्यालयाने योग्य निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्‍या धर्मांध विद्यार्थिनींनी भविष्यात कायदाद्रोही वर्तन करून समाजाची शांतता बिघडवल्यास आश्‍चर्य ते काय ?

प्रतीकात्मक छायाचित्र

बेंगळुरू – कर्नाटकातील उडुपी येथील प्री युनिवर्सिटी महाविद्यालात प्रयोग परीक्षेच्या वेळी ३ धर्मांध विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या होत्या. त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाने त्यांना परीक्षेस बसण्याची अनुमती नाकारली. ‘अंतिम आदेश येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी केवळ गणवेश घालून महाविद्यालयात यावे’, असा कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन करण्यास या ३ धर्मांध विद्यार्थिनींनी नकार दिला. त्यामुळे त्यांना प्रयोग परीक्षेला बसण्याची अनुमती नाकारण्यात आली. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रुद्र गौडा म्हणाले, ‘‘मी या विद्यार्थिनींना उच्च न्यायालयाचा आदेश समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला; मात्र त्यांनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला.’’