भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता ! – शिक्षणमंत्री उदय सामंत

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमीपूजन होऊ शकले नाही.

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या कार्यालयांच्या जवळून बनावट नोटा जप्त

पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.

उच्च न्यायालयांनी इतर मते मांडण्याऐवजी केवळ खटल्यापुरतेच बोलावे !

देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेविषयी निरीक्षणे नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. ती निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने हटवत उच्च न्यायालयांना वरील सल्ला दिला.

सौदी अरेबियासह अनेक इस्लामी देशांमध्ये पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्यावर बंदी ! – तस्लिमा नसरीन

विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

मिर्‍याबंदर (रत्नागिरी) येथे स्थानिक मासेमारांनी पकडली अवैधपणे मासेमारी करणारी परप्रांतीय नौका

अवैधपणे मासेमारी करणारी नौका स्थानिक मासेमारांनी पकडून देणे, हे मत्स्यविभागाला लज्जास्पद ! जे स्थानिक मासेमार्‍यांना जमते, ते सर्व यंत्रणा हाताशी असतांना मत्स्यविभागाला का जमत नाही ?

नेहरूंच्या भारतात सध्या निम्म्या खासदारांवर गुन्हे नोंद ! – सिंगापूरच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती

भारत सरकारकडून आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदूताला समन्स
ही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

भरतनाट्यम् नृत्याचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेतांना जोधपूर, राजस्थान येथील कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

नृत्यापूर्वी सिद्धता करतांना मला अन्य साधिका साहाय्य करत होत्या. तेव्हा ‘साक्षात् श्री भवानीदेवीच मला सजवत आहे’, असे मला जाणवत होते.

तळेरे येथे अतीप्राचीन मूर्तीसह एक जण पोलिसांच्या कह्यात

कणकवली तालुक्यातील तळेरे येथून पोलिसांनी सापळा रचून एका मूर्तीसह एका संशयिताला कह्यात घेतले आहे. ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ आणि अतीप्राचीन असून ती कोट्यवधी रुपये मूल्याची असल्याचे समजते.

३८ जणांना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावास

कर्णावती (गुजरात) येथे वर्ष २००८ मधील २१ साखळी बाँबस्फोटांचे प्रकरण
बाँबस्फोटासारख्या प्रकरणी १४ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नसून अन्यायच म्हणावा लागेल ! अशांमुळेच जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे फावते !

काणकोण तालुक्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे कार्य विस्मृतीत जाण्याची चिन्हे

आजची पिढी, सरकारी यंत्रणा आणि काणकोणवासीय यांना डॉ. गायतोंडे यांच्या त्यागाचा हळूहळू विसर पडत चालला आहे. यंदा गोवा मुक्तीचे ६० वे वर्षे साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीच्या निमित्ताने . . .