|
रत्नागिरी – तालुक्यातील मिर्याबंदर येथे अवैधपणे मासेमारी करणारी परप्रांतीय नौका येथील स्थानिक मासेमारांनी पकडून कायदेशीर कारवाई करण्यासाठी मत्स्यविभागातील अधिकार्यांच्या कह्यात दिली. (अवैध मासेमारीवर स्वत: काहीही न करणारे अधिकारी स्थानिकांनी पकडून दिलेल्या नौकेवर तरी कारवाई करतील का ? – संपादक)
या परराज्यातील यांत्रिकी नौकेचे नाव जॉफी (आयएनडी – टीएन् – १५ एम्एम् – ७२४८) असे आहे. ही नौका पकडल्यानंतर मासेमारांनी मत्स्यविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधल्यानंतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. मत्स्यविभागाच्या अधिकार्यांनी नौकेवरील खलाशांची विचारपूस केली असता त्यांनी ‘एका स्थानिकानेच या आम्हाला बोलावले’, असे सांगितले.
दरम्यान, मत्स्यविभागाच्या अधिकार्यांनी मिर्याबंदर येथे नौकेवर कारवाई न करता ती नौका मिरकरवाडा बंदरात नेली. नौका कह्यात घेतल्यानंतर ‘मत्स्यविभागाच्या अधिकार्यांनी काय कारवाई केली ?’, असा प्रश्न मासेमारांना पडला असून त्यांनी ‘या नौकेवर ठोस कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.