‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन !

खानापूर येथे उपतहसीलदार,शिक्षणाधिकारी, तसेच खानापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी शरनेश जारळी यांना निवेदन देण्यात आले.

गुन्हा रहित करण्यासाठी न्यायालयाने दोषींना दिली वृद्धाश्रमात सेवा करण्याची शिक्षा !

या युवकांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला ‘ऑनलाईन गेमिंगमध्ये अधिक पैसे मिळवून देतो’, असे आमिष दाखवून फसवले. स्वत:चे पैसे मागण्यासाठी आल्यावर त्या व्यक्तीला युवकांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो.

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळच्या तत्कालीन अधिवक्त्यांना ‘इसिस’ची धमकी !

आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेणार्‍यांना आतातरी आतंकवादाच्या तीव्रतेची जाणीव होणार का ?

समर्थ रामदासस्वामी यांचे ग्रंथ प्रेरणादायी ! – भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्राला संत आणि वारकरी यांची मोठी परंपरा आहे. संतांचे विविध ग्रंथ मानवजातीला पावलोपावली दिशा देण्याचे कार्य करतात. समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ग्रंथ, ग्रंथराज दासबोध, तसेच अनेक साहित्य अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे १७ फेब्रुवारीपासून ‘दासनवमी उत्सवास’ प्रारंभ !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ‘दासनवमी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. काकड आरती आणि श्रीराम पंचायतनाची महापूजा करून उत्सवाला प्रारंभ झाला.

आत्महत्या करणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला न्याय मिळावा, यासाठी ‘अभाविप’कडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !

तामिळनाडूमधील लावण्या हिच्या आत्महत्येचे मुंबई आणि पालघर येथे पडसाद !

लावण्याला न्याय मिळावा, यासाठी ‘अभाविप’कडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !

‘लावण्या’ ख्रिस्ती होत नसल्यामुळे मागील २ वर्षांपासून शाळेतील ख्रिस्ती शिक्षिका तिला शौचालय स्वच्छ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे अशी कामे करायला सांगून तिचा मानसिक छळ करत होत्या. या त्रासाला कंटाळून लावण्या हिने विषप्राशन करून आत्महत्या केली.

बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

ठिकठिकाणी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला जात असतांनाही पोलीस अशांवर जरब बसेल, अशी कारवाई का करत नाहीत ?

अरुणाचल प्रदेश येथे ट्रक दरीत कोसळल्याने दिंडोरी (नाशिक) येथील सैनिकास वीरमरण !

अरुणाचल प्रदेशमध्ये देशाच्या संरक्षणार्थ सेवा बजावत असतांना जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर यांना १४ फेब्रुवारी या दिवशी अपघाती वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि भाऊ, असा परिवार आहे.