उच्च न्यायालयांनी इतर मते मांडण्याऐवजी केवळ खटल्यापुरतेच बोलावे !

सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयांना सल्ला

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने, ‘उच्च न्यायालयांनी त्यांच्यापुढे असलेल्या खटल्यापुरतेच काय ते बोलावे, खटल्याशी संबंध नसलेली इतर सर्वसाधारण मते मांडू नयेत’, असा सल्ला दिला आहे. देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेविषयी निरीक्षणे नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. ती निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने हटवत उच्च न्यायालयांना वरील सल्ला दिला.