‘धृपद’ आणि ‘ख्याल’ या गायनप्रकारांचा सराव करतांना अन् अन्य कलाकारांनी गायलेले तेच गायनप्रकार ऐकतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी केलेला तुलनात्मक अभ्यास

संगीताचा सराव करतांना धृपद आणि ख्याल या गायनप्रकारांचा अभ्यास केला. त्या वेळी आलेल्या अनुभूती आणि झालेला तौलनिक अभ्यास पुढे दिला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

ऋषीयागामध्ये कश्यपऋषींसाठी यज्ञामध्ये आहुती देण्यात येत होती. त्या वेळी मला कश्यपऋषींचे दर्शन झाले. त्यांना पहाताच माझ्याकडून मनोमन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आणि साधकांना होत असलेला अनिष शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना झाली.