अमेरिकेला ख्रिस्ती राष्ट्र करण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न !

२८ गव्हर्नरांचे (राज्यांच्या प्रमुखांचे) समर्थन !

‘पुरोगामी’ म्हणून ओळल्या जाणार्‍या अमेरिकेतही बहुसंख्य असणार्‍या ख्रिस्त्यांना त्यांचा देश ‘ख्रिस्ती राष्ट्र’ असावा’, असे वाटत असेल, तर बहुसंख्य हिंदूंना त्यांचा भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, असे वाटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

नवी देहली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना २८ गव्हर्नरांचे समर्थनही मिळाले आहे. सध्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टी शासित राज्यांतील चर्चमध्ये रविवारच्या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये ट्रम्प यांना ‘ख्रिस्ती अमेरिकींचा नायक’ संबोधले जात आहे. श्‍वेतवर्णियांच्या या कार्यक्रमामध्ये ट्रम्प यांना प्रेषित ठरवत ‘ख्रिस्ती अमेरिका’ स्थापन करण्याचे उद्दिष्ट सांगितले जात आहे. ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रार्थनाही होत आहेत.