उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार !

काँग्रेसचे अध्यक्षपद एका महिलेकडे आहे, उत्तरप्रदेशातील प्रमुखपद महिलेकडे आहे. असे असतांना पक्षामध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ?

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब घालण्याची मागणी करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मुसलमान विद्यार्थिनी धर्माच्या संदर्भातील परंपरा पाळण्यासाठी न्यायालयापर्यंध धाव घेतात, तर कॉन्व्हेंट शाळेत कुंकू, बिंदी, बांगड्या काढण्यास सांगितल्यावर हिंदू विद्यार्थिनी ते निमूटपणे काढून येशूची प्रार्थना करतात !

गाय वाचवली, तर देश वाचेल ! – राजेंद्र लुंकड, गोविज्ञान संशोधन संस्था

त्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना सांगून गोमूत्र आणि शेण यांच्या आधारे म्हणजेच गायीवर आधारित शेती अन् सेंद्रिय शेती करण्यास शिकवले. सेंद्रिय शेतीतून प्रतिदिन सहस्रोंचा लाभ कसा करून घ्यावा, याविषयी त्यांचे प्रबोधन केले.

संभाजीनगर येथील ‘३०-३०’ घोटाळ्यात मंत्री, आमदार आणि पोलीस अधिकारी यांची गुंतवणूक असल्याचे उघड !

घोटाळेबाजांवरील आरोप निश्चित झाल्यावर त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कारागृहात असणार्‍या निरपराध्यांनो, विचार करू नका ! जर तुम्हाला खोटेपणाने अडकवले असेल, तर तसे करणार्‍या पोलिसांसकट प्रत्येकाला कर्मफलन्यायानुसार फळ भोगावेच लागेल !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाषा म्हणून हिंदीला आमचा मुळीच विरोध नाही; पण ती लादण्याला आमचा विरोध ! – तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन

स्टॅलिन पुढे म्हणाले की, मातृभाषा बोलणारे संकुचित विचारसरणीचे असतात, हा चुकीचा समज आहे. आम्ही तमिळ बोलत असल्याने संकुचित विचारसरणीचे आहोत, असा त्याचा अर्थ होत नाहीत.

नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल’ पुरस्काराने सन्मानित !

पदक, १ लाख रुपये आणि प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील ६ बालकांमध्ये येथील कु. श्रीनभ अग्रवाल याचाही समावेश आहे. क्रीडा, शौर्य आणि नवसंशोधन यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रजासत्ताकदिनी किशनगंज (बिहार) येथे महंमद आबिद हुसेन याच्याकडून सरकारी शाळेमध्ये राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न

बिहार भारतात आहे कि पाकिस्तानात ? बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे सरकार असतांना धर्मांधांचे अशा प्रकारचे धाडस कसे होते ?

मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू केला आहे; मात्र हा कायदा केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला.