अमेरिकेने युक्रेनला पाठवलेल्या प्रत्येक क्षेपणास्त्रावर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे नाव !  

अमेरिकेने युक्रेनला पाठवलेली क्षेपणास्त्रे

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये केव्हाही युद्ध होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी अमेरिकेकडून युक्रेनला शेकडो ‘जेव्हलिन’ आणि ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रे पाठवण्यात आली आहेत. या प्रत्येकावर अमेरिकेने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे नाव कोरले आहे. युद्धाच्या विचारांतून मागे हटण्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वीच रशियासहित राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याला याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणीही बायडेन यांनी दिलेली आहे.