हिंदु जनजागृती समितीचे अभियान – राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !
पुणे, २८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान राबवण्यात आले. या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ जानेवारी या दिवशी या अभियानाच्या अंतर्गत पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड येथे ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाच्या संहितेविषयी प्रबोधन करणारी निवेदने देण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे शाळा, प्रशासन यांमध्ये एकूण ३५ निवेदने देण्यात आली. यांसह फलक प्रसिद्धीच्या माध्यमांतून प्रसार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील वडगाव मावळ येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यांसह ३ शाळांमध्येही अशाच प्रकारे निवेदन देण्यात आले. फलक प्रसिद्धीद्वारे पुणे येथे ३७, तर पिंपरी-चिंचवड येथे २४ फलकांच्या माध्यमांतून राष्ट्रध्वजाच्या संहितेविषयी प्रबोधन करण्यात आले.
२६ जानेवारीला वनाज परिवार विद्यामंदिर शाळा येथे ५७ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्यान पार पडले !कोथरूड येथील वनाज परिवार विद्यामंदिर शाळेने ५७ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित खामणकर यांनी राष्ट्रध्वजाच्या संहितेविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यांसह सौ. उन्नती खामणकर, श्री. नारायण पाटील यांनीही या सेवेत सहभाग घेतला. |