कथित आक्षेपार्ह विधानावरून ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधातील याचिका

न्यायालयाने पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागितला

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके

नवी देहली – ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी येथील गोंविदपुरी भागामध्ये एका कार्यक्रमात केलेल्या कथित आक्षेपार्ह भाषणावरून त्यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे. यावर पुढील सुनावणी १५ मार्च या दिवशी होणार आहे. ही याचिका ‘वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. सैय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रविष्ट केली आहे. देहलीच्या दंगलीच्या प्रकरणी अटकेत असलेला उमर खालीद या इलियास यांचा मुलगा आहे.

सुरेश चव्हाणके यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी १९ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी एका समुहाला ठार मारण्याची शपथ दिली. तसेच या कार्यक्रमाच्याच दिवशी चव्हाणके यांनी ट्वीट करत ‘एकच स्वप्न : हिंदु राष्ट्र’ म्हटले होते. ‘असे म्हणणे राज्यघटनेच्या विरोधात आहे’, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.