‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धर्मांधाची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांना धमकी !

पोलिसांशी उद्दामपणे वागणारे धर्मांध सामान्य हिंदूंशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

मुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता !

‘पुरातत्व विभाग प्राचीन गड-दुर्गांचे जतन करण्यासाठी आहे कि ते नष्ट करण्यासाठी ?’, असा कुणालाही प्रश्न पडेल. या विभागाची दुःस्थिती पालटण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का ?

‘ए.टी.एस्.’ची बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता देणार ! – गृहमंत्री वळसे पाटील

मालेगाव बाँबस्फोटाच्या चालू असलेल्या खटल्यात ‘ए.टी.एस्.’ची बाजू मांडण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी नुकतीच ए.टी.एस्. प्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी !

नवी मुंबईत डिझेलची तस्करी करणार्‍या ५ जणांना अटक

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उरणच्या समुद्रात डिझेलची तस्करी करणार्‍या ५ जणांना अटक केली आहे. या आरोपींनी २ जहाजांमध्ये अनधिकृतपणे साठा केलेले २१ सहस्र ४७० लिटर डिझेल कह्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे महापालिकेतील २३ गावांमध्ये पाणी प्रश्न गंभीर !

महानगरपालिकेत २३ गावे समाविष्ट होण्यापूर्वी प्राधिकरणाने बांधकामास अनुमती देतांना व्यावसायिकाने सोसायट्यांना टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी अट घातली होती; मात्र व्यावसायिकांनी दायित्व महापालिकेवर टाकल्याने पाणीपुरवठा बंद झाला.

भेदभाव नको !

आतापर्यंत राजघराण्यातील अनेक महनीय व्यक्तींनी सातारा नगरपालिकेचा कारभार यशस्वीरित्या हाताळला आहे; मात्र हीच नगरपालिका आता कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली आहे.

भोसरी (पुणे) येथील मंदिरातील निर्माल्याचे खत होणार !

सिद्ध झालेले खत बागा आणि महापालिकेच्या उद्यानातील झाडांना टाकणार आहे. या उपक्रमामुळे मंदिरे ‘कचरामुक्त’ होतील

बनावट गुन्ह्यात ३ युवकांना अडकवून पैसे उकळल्याप्रकरणी सालेकसा (गोंदिया) येथील ५ पोलीस निलंबित !

जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ३ युवकांना अवैध मद्यविक्रीच्या बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ५ पोलिसांचे निलंबन केले आहे.