पुणे – मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत (कचर्याच्या गाडीत) टाकले जात असल्याने नागरिकांनी अप्रसंन्नता व्यक्त केली होती. नागरिकांच्या धार्मिक भावना जोपासण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या वतीने भोसरी प्रभाग क्रमांक ५ मध्ये मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जाणार नसून निर्माल्यासाठी मंदिरांना ‘निर्माल्य कलश’ देणार आहे आणि त्यात खत निर्मिती केली जाणार आहे. निर्माल्यातून खतनिर्मितीचा हा पर्यावरण पूरक उपक्रम राबवणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले. सिद्ध झालेले खत बागा आणि महापालिकेच्या उद्यानातील झाडांना टाकणार आहे. या उपक्रमामुळे मंदिरे ‘कचरामुक्त’ होतील, असेही ते म्हणाले.