महाळुंगे पडवळ (पुणे) येथील श्री कमलजादेवी मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून चांदीच्या पादुकांची चोरी !

कळंब येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन वाजल्याने चोर घाबरून पळून गेले.

अमरावती येथे पुतळे बसवण्यावरून राजकारण : शहरासह दर्यापूर येथे तणाव !

शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद जिल्ह्यातील दर्यापूर गावातही उमटले आहेत.

वर्धा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आधुनिक वैद्य नीरज कदम यांना अटक !

जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कदम रुग्णालयातील आधुनिक वैद्या रेखा कदम यांचे पती आधुनिक वैद्य नीरज कदम यांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींची संख्या ६ झाली आहे. 

मुंबईकरांना महापालिकेच्या ‘ॲप’द्वारे विविध ८० सुविधा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

नागरिकांना घरबसल्या ‘गणेशोत्सव मंडप अनुमती’, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक आदी माहिती व्हॉट्सॲपवर सहज उपलब्ध होतील.

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

उंचगावसह (जिल्हा कोल्हापूर) प्रत्येक गावातील ७/१२ उतार्‍यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्‍यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत.

नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दल भरतीच्या लेखी परीक्षेस बसवले ३ बनावट (खोटे) उमेदवार !

पोलीसदलाच्या भरती प्रक्रियेत घोटाळे करणारे कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

नेवासे (नगर) येथील श्री नारदमुनी मंदिरातच बांधली अवैध मदार (थडगे) !

उद्दाम धर्मांधांचा श्री नारदमुनी मंदिरातील लॅण्ड जिहाद ! गडकिल्ल्यांवर अवैधपणे थडगी उभारणाऱ्या धर्मांधांची मजल मंदिरापर्यंत जाणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन केल्याचा परिणाम !

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात जाणा !

तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील वडामडुराई येथील श्री गणेश मंदिरातील देवतांच्या मूर्तींचे भंजन करणार्‍या बालकृष्णन् नामक बाटग्या ख्रिस्त्याला अटक करण्यात आली. त्याने देवतांच्या एकूण ५ मूर्ती फोडल्या.

भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव !

चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्‍याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले.