पुणे – महानगरपालिकेत २३ गावे समाविष्ट होण्यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने बांधकामास अनुमती देतांना बांधकाम व्यावसायिकाने सोसायट्यांना टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी अट घातली होती; मात्र ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी पाणीपुरवठा करण्याचे दायित्व महापालिकेवर टाकल्याने सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद झाला. महापालिकेची पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा अस्तित्वात नाही.