अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करू ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

अवैध वाळू उत्खनन करणार्‍या लोकांनी अनेक ठिकाणी १०-१५ फुटांचे खोल खड्डे खणले असून यात पडून ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे होणारे अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होत नाहीत !

आयकर विभागाकडून चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या २५ ठिकाणी धाडी

आयकर विभागाने २२ डिसेंबर या दिवशी चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या देशभरातील २५ ठिकाणी धाडी घातल्या. करचुकवेगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

लुधियाना (पंजाब) येथील न्यायालयात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू !

लुधियाना येथील न्यायालय परिसरात स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. हा स्फोट न्यायालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील ९ क्रमांकाच्या न्यायालयात झाल्याचे सांगण्यात आले आहे

अमृतसर (पंजाब) येथे अज्ञातांकडून श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि चोरी

पंजाब येथील अजनाला भागामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञातांनी पुजार्‍याला एका खोलीत बंद करून मंदिरातील देवतांच्या २ मूर्तींची तोडफोड केली आणि तेथील मौल्यवान दागिने अन् दुचाकी घेऊन पलायन केले.

पंजाबमधील काँग्रेसचे सगळे आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतलेले ! – अमरिंदर सिंह

काँग्रेसचे सर्व आमदार जर वाळूच्या अवैध व्यवसायात असतील, तर देशातील अन्य राज्यांतील किती आमदार अशा प्रकारचा अवैध व्यावसाय करत असतील, याची कल्पना करता येत नाही ! यातून भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

बेंगळुरू येथील घटना केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणी असे निंदनीय कृत्य करण्यास धजावणार नाही – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी मंत्री जेनिफर यांचे आरोपपत्र रहित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणीचा खटला १३ वर्षांनंतर न्यायालयात चालत असेल, तर सामान्य नागरिकांना कधी न्याय मिळत असेल ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

‘गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड का केली ?’ याविषयीची माहिती राजकीय पक्षांनी सार्वजनिक करणे आवश्यक

प्रत्येक उमेदवाराला त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयीची माहिती प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणी आदींच्या माध्यमातून सार्वजनिक करावी लागणार !

सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक गोविंद प्रभु चिमुलकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान !

गोवा मुक्ती लढ्यातील एका सत्याग्रहात पोतुगीज सैनिकांनी काही सत्याग्रहींना अत्यंत घायाळ अवस्थेत काटेरी जंगलात फेकून दिले होते. मुंबईहून नोकरी सोडून आलेल्या चिमुलकरांचा यामध्ये समावेश होता.