आयकर विभागाकडून चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या २५ ठिकाणी धाडी

नवी देहली – आयकर विभागाने २२ डिसेंबर या दिवशी चिनी भ्रमणभाष आस्थापनांच्या देशभरातील २५ ठिकाणी धाडी घातल्या. करचुकवेगिरीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. ओप्पो, शाओमी, वन प्लस आदी चिनी आस्थापनांशी संबंधित देहली, कोलकाता, गुवाहाटी, इंदूर, मुंबई, भाग्यनगर, बेंगळुरू आदी शहरांतील कार्यालयांवर या धाडी घालण्यात आल्या. या आस्थापनांच्या काही अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येत आहे.