पंजाबमधील काँग्रेसचे सगळे आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतलेले ! – अमरिंदर सिंह

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आमदारांची नावे सांगण्यास नकार

  • कॅप्टन अमरिंदर सिंह राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी अशा भ्रष्ट आमदारांवर कारवाई का केली नाही ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! अशा प्रकारचे त्यांनी भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातल्याने त्यांच्यावरही आता कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून या सर्वांची नावे घेऊन केंद्र सरकारने त्या आमदारांवरही कारवाई केली पाहिजे ! – संपादक
  • काँग्रेसचे सर्व आमदार जर वाळूच्या अवैध व्यवसायात असतील, तर देशातील अन्य राज्यांतील किती आमदार अशा प्रकारचा अवैध व्यावसाय करत असतील, याची कल्पना करता येत नाही ! यातून भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक

चंडीगड – पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत; मात्र आपण कुणाचीही नावे सार्वजनिक करणार नाही. ‘कोण सहभागी आहे ?’ याऐवजी ‘कोण सहभागी नाही ?’ हे विचारा. मी नावे सांगायला प्रारंभ केला, तर वरून चालू करावे लागेल. मला ते करायचे नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

यापूर्वीच अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले होते, आपल्या पक्षाचे अनेक आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतल्याचे अहवाल त्यांच्याकडे आहेत.’ (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना याविषयी ठाऊक होते आणि त्यांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणतीही कृती केली नाही, यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) पंजाब विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. (मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही ? – संपादक)