कार्तिक अमावास्येला होणार्‍या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित

ज्योतिषी सचिन मल्होत्रा

मुंबई – कार्तिक अमावास्या ५ नोव्हेंबरच्या उत्तररात्री पावणे तीन वाजता आहे. या वेळी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने एक असा योग सिद्ध होत आहे, ज्यामुळे भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवल्याचे वृत्त ‘नवभरात टाइम्स’ने प्रकाशित केले आहे. याच योगामुळे येत्या २० दिवसांत हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये अनुमाने २० दिवस भूकंपाचे धक्के जाणवू शकतात, असेही मल्होत्रा यांनी सांगितले.

१. मंगळ एक अग्नीतत्त्व प्रधान ग्रह असून तो सध्या शुक्रच्या तुळ राशीमध्ये सूर्यासह युतीमध्ये आहे. याचा प्रभाव चित्रपट आणि कला क्षेत्रांतील मोठ्या लोकांना होऊन पुढील एक मास त्यांना कठीण जाऊ शकतो.

२. काश्मीरमध्ये सध्या विकासकामे चालू असून तेथे गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले जात आहे. अशा प्रकारची गुंतवणूक रोखण्यासाठी येत्या ३० दिवसांत पाकिस्तान घातपात घडवून आणू शकतो आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो, अशीही शक्यता मल्होत्रा यांनी त्यांच्या भाकितामध्ये वर्तवली आहे.