पनवेल मुख्य टपाल कार्यालयाकडून ‘पोस्टल वीक’ अंतर्गत सनातनच्या साधकाचा सत्कार !

‘सनातन चैतन्य भांडार’कडून सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वितरणासाठी उपलब्ध करण्यात येतात. ‘सनातन चैतन्य भांडार’कडून गत ८ वर्षे टपाल विभागाच्या ‘पार्सल’ सेवेचा लाभ घेतला जातो.

नागपूर येथे संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला सहकार्याचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित मान्यवर यांनी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

अमरावती येथे शेतकर्‍यांना साहाय्य देण्याच्या सूत्रावरून आमदार रवि राणा यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ !

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १८ ऑक्टोबर या दिवशी आमदार रवि राणा यांनी शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी साहाय्य देण्याच्या सूत्रावरून गोंधळ घातला. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली.

पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना !

‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रहित करण्याची मागणी भारतातील राष्ट्रप्रेमींकडून होत आहे.

मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पंचायत समिती सदस्य आक्रमक

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पंचायत समिती सदस्यांना आक्रमक व्हावे लागणे आणि त्यावरून बाचाबाची होणे प्रशासनाला लज्जास्पद !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या त्यागपत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ !

शहरातील भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी भागाला जोडणार्‍या उड्डाणपुलाचा काही भाग १९ ऑक्टोबर या रात्री कोसळून अपघात झाला होता. त्या भागात काम बंद असल्याने दुर्घटना टळली.

कणकवली नगरपंचायत भरवणार ‘दिवाळी बाजार’

दिवाळीच्या निमित्त कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘दिवाळी बाजार’ भरवण्यात येणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून बनवण्यात येणारा आकाश कंदील, आदी वस्तू यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

असे भारतात कधी होणार ?

जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद