नागपूर येथे संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला सहकार्याचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे संपर्क अभियान

नागपूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित मान्यवर यांनी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

धर्मांतर रोखण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता ! – पू. भागीरथी महाराज, संस्थापक, श्री गुरुकृपा सेवा संस्थान, नागपूर

पू. भागीरथी महाराज यांना ’सनातन पंचांग २०२२’ देतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)

कोरोनाच्या काळात धर्मांतराचा विळखा वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी समाजप्रबोधन करून हिंदु धर्माचे महत्त्व अधोरेखित करणे, ही काळाची आवश्यकता आहे. मी कीर्तन आणि प्रवचन यांच्या माध्यमातून धर्माचे महत्त्व सांगून समाजप्रबोधन करण्यासाठी प्रेरित करीन.

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या व्यापक कार्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा ! – प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू

(डावीकडे) श्री. सुनील घनवट प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू आणि त्यांच्या पत्नी सौ. सिंगरू यांना ‘सनातन पंचांग २०२२’ देतांना

हिंदु धर्माचे महत्त्व अगाध आहे; पण आज हिंदूंना हिंदु धर्माचे शिक्षण कुठेही दिले जात नाही. यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या धर्मप्रसाराच्या व्यापक कार्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू.

वेदपाठशाळेत नियमितपणे धर्मशिक्षणवर्ग चालू करीन ! – प्रवीण लिगदेगुरुजी, संचालक, वेदपाठशाळा, नागपूर

श्री. लिगदेगुरुजी (डावीकडे) यांना सनातन पंचांग २०२२ देतांना श्री. सुनील घनवट

‘धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि आवश्यकता’ हा विषय समजल्याने माझ्या वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मी नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करणार आहे.

लव्ह जिहाद आणि ‘हिजाब डे’ यांसारख्या षड्यंत्रापासून हिंदु मुलींचे रक्षण झाले पाहिजे ! – सौ. स्नेहल जोशी, विदर्भ ब्युरो चीफ, सुदर्शन वाहिनी, नागपूर.

मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद, ‘हिजाब डे’ यांसारख्या माध्यमातून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. यासह पाश्चात्त्यांचे अंधानुकरणही होत आहे. धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदु धर्माचे महत्त्व सांगून युवकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होणार्‍या आघातांच्या संदर्भात हिंदूंमध्ये जागृती व्हायला हवी ! – राजेश मोटघरे, संचालक, यू.सी.एन्. केबल नेटवर्क, नागपूर

आज विविध माध्यमांतून हिंदु देवता, राष्ट्रपुरुष, देवी-देवता, राष्ट्रपुरुष, संस्कृती यांवर सतत आघात होत आहेत. याविषयी हिंदूंना वास्तव सांगून त्यांच्यामध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. हिंदूना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन.