हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

या कार्यक्रमामध्ये ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा आणि ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनी मार्गदर्शन केले.

नागपूर येथे ऐतिहासिक काळ्या आणि पिवळ्या मारबतीची मिरवणूक न काढता दहन !

‘काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे दर्शन केल्याने अरिष्ट टळते’, अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

एकनाथ खडसे यांनी पुणे येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते ! – ‘ईडी’च्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्राथमिकदृष्ट्या पहाता भोसरी (जिल्हा पुणे) येथील भूमी खरेदीत अपव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे’, असे निरीक्षण अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) ९ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात नोंदवले आहे.

‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन

कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यामुळे कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया जाते. काही ठिकाणी तथाकथित पर्यावरणवादी संघटना श्री गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तिकारांनाच विकतात…

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध, ही हिंदूंची गळचेपी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल !

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 

विकासक योगेश देशमुख यांचा जामीन रहित करण्याची ‘ईडी’ने प्रविष्ट केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

खासदार भावना गवळी अंमलबजावणी संचालनालयावर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत ! – हरीश सारडा, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. जर माझी हत्या झाली, तर त्याला त्या उत्तरदायी असतील, असे ते पुढे म्हणाले.