कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू !

सौजन्य TV -9 मराठी

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. १० ते १९ सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाचहून अधिक व्यक्ती एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.