मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

नवी देहली – केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. ते येथे ‘पांचजन्य’ या नियतकालिकाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पाकिस्तान अँड द पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख आहे’, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.