सावंतवाडी – टपाल कार्यालयात दलालाच्या (एजंटच्या) वतीने काम करणार्या एका महिलेने ग्रामीण भागातील महिलेची ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली. संबंधित महिलेने टपाल खात्यात भरण्यासाठी दिलेली रक्कम भरलीच नाही, असे फसवणूक झालेल्या महिलेचे म्हणणे आहे. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला. मधल्या कालावधीत वारंवार मागणी करूनही संबंधित महिलेने पैसे परत न केल्याने फसवणूक झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी चालू आहे.