अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन !

अभाविपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करणारे विद्यार्थी कार्यकर्ते

सांगली, २५ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, साकीनाका, जालना, नागपूर, परभणी, पालघर, नांदेड, डोंबिवली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला काळिमा फासणार्‍या आहेत. महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, महानगरमंत्री ऋषिकेश पाटील, सहमंत्री दर्शन मुंदडा, बागेश्री उपळाविकर, अनुश्री विसपुते, तन्वी खाडीलकर, सूरज मालगावे यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.