पुणे, २५ सप्टेंबर – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ‘सामा’ या खासगी आस्थापनाच्या माध्यमातून दंड झालेल्या वाहनचालकांना भ्रमणभाष संदेशद्वारे नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. पुढील कारवाई टाळण्यासाठी आकारण्यात आलेले ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात सकाळपासून गर्दी केली होती; परंतु दंडाचे प्रकरण निकालात काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता.
नागरिकांना आलेल्या ‘मेसेज’मध्ये दंड भरण्याची लिंकही देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष न्यायालयात येण्याऐवजी ऑनलाईन पैसे भरले तरी चालू शकेल, असे पोलीस प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.