कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, यासाठी कोरोना महामारीच्या कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन
कोरोना महामारीच्या कालावधीत ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम केलेल्या आरोग्य कर्मचार्यांना शासनाने कामावरून काढले आहे. या कर्मचार्यांनी शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, यासाठी १५ सप्टेंबर या दिवशी जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.