परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे २३ वर्षांपासून साधनेच्या पथावर सेवारत असणारे इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सदाशिव जाधव (वय ८६ वर्षे) आणि सौ. रजनी जाधव (वय ७८ वर्षे) !
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा सनातन संस्थेशी संबंध वयाच्या ६२ व्या वर्षी, म्हणजे १९९७ पासून आला. तत्पूर्वी मी अन्य एका आध्यात्मिक संस्थेच्या संपर्कात होतो; पण त्यांच्या प्रवचनातून मला ‘साधना म्हणून काय करायचे ?’, हे कळत नव्हते.