लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोर सर्वाधिक !

लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या सरकारी यंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.

भंडारदरा (नगर) परिसरात मद्यपी पर्यटकांची पोलीस आणि ग्रामस्थ यांना मारहाण

मद्यबंदी हटवणारे प्रशासन मद्याचे दुष्परिणाम लक्षात घेणार का ? पोलीस मार खातात यातून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते कि नाही, असा प्रश्न पडतो !

संभाजीनगर येथे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि दलाल यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक !

मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, भ्रष्टाचाराने पोखरलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय !

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोरोना नियमावलींचे पालन करत १४ जुलै या दिवशी ‘आयुर्वेद व्यासपीठ’ या संघटनेच्या ‘चरक भवन’ या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण दुपारी २ वाजता भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाचे ‘ऑनलाईन’ दर्शन २४ घंटे चालू रहाणार !

१२ जुलै या दिवशी परंपरेनुसार देवाचा पलंग कढण्यात आला. कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असले तरी भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू रहाणार आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीत वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे येत असत.

मगरीची पिल्ले विक्रीसाठी आणणार्‍या धर्मांधाला मुंब्रा येथून अटक

मगरीची पिल्ले विक्रीसाठी आणणार्‍या साकलेन खतीब याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मुंब्रा येथील कौसा परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून काळ्या करड्या रंगांची ७ जिवंत मगरीची पिल्ले जप्त करण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील ‘झोटिंग समिती’चा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गहाळ !

माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी (पुणे) येथील औद्योगिक वसाहतीमधील भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने न्यायमूर्ती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘झोटिंग समिती’ नियुक्त केली होती.

पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या एजंटला गुजरातमधून अटक !

पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या तसेच मागील ४ वर्षांपासून पसार असलेल्या शिवा एजंट उपाख्य शिवा चौधरी यास पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे.

चंद्रपूर येथे विद्युत् जनित्रामधून विषारी वायूची गळती झाल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू !

शहरातील दुर्गापूर येथे वीज नसल्यामुळे वातानुकुलित यंत्र (एसी) चालवण्यासाठी लावलेल्या विद्युत् जनित्रामधून (जनरेटर) झालेल्या कार्बन डायऑक्साईड या विषारी वायूच्या गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या कुटुंबातील ६ जणांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून वितरित करण्यात आलेले साडेसतरा सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडीत !

एरव्ही कर्ज घेतलेल्या सामान्य खातेदारांनी हप्ते न फेडल्यास त्यांच्या मागे बँकांकडून तगादा लावला जातो. शेवटचा पर्याय म्हणून अशांची संपत्तीही जप्त केली जाते. याउलट ‘श्रीमंत’ थकबाकीदारांना नेहमीच ‘विशेष वागणूक’ दिली जाते !