नाशिक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत २ दिवसांच्या नाशिक दौर्यावर येत आहेत. कोरोना महामारीमुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. कोरोना नियमावलींचे पालन करत १४ जुलै या दिवशी ‘आयुर्वेद व्यासपीठ’ या संघटनेच्या ‘चरक भवन’ या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण दुपारी २ वाजता भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर कन्नमवार पुलाजवळील नूतन कार्यालयाच्या वास्तूस भागवत भेट देणार आहेत. १५ जुलै या दिवशी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी श्री सवितानंद यांचा ‘अमृतमहोत्सव’ कार्यक्रम दुपारी २ वाजता ‘नक्षत्र लॉन्स’ येथे होईल, अशी माहिती संघाचे नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी दिली.