पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या एजंटला गुजरातमधून अटक !

पुणे, १३ जुलै – पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या तसेच मागील ४ वर्षांपासून पसार असलेल्या शिवा एजंट उपाख्य शिवा चौधरी यास पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे. शहरात सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी संबंधित टोळीविरुद्ध वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मकोका) नुसार कारवाई करण्यात आली होती. सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साहाय्याने शिवा चौधरीला अटक केली आहे.