ठाणे, १३ जुलै (वार्ता.) – मगरीची पिल्ले विक्रीसाठी आणणार्या साकलेन खतीब याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मुंब्रा येथील कौसा परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून काळ्या करड्या रंगांची ७ जिवंत मगरीची पिल्ले जप्त करण्यात आली आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात. – संपादक) काळी जादू किंवा अघोरी कृत्य करण्यासाठी या मगरींची विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.