राज्यातील कृषी तंत्र निकेतनच्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात !

‘कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश देण्यात यावा’, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने ९ जुलै या दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात आंदोलन केले.

पुण्यात महिला पोलीस अधिकार्‍याला मारहाण करणार्‍याविरुद्ध तक्रार प्रविष्ट

महिला पोलीस उपनिरीक्षकांशी अशा प्रकारे वागणारी व्यक्ती अन्य वेळी इतरांशी कशी वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा !

सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक करणार्‍यांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात यावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

राज्यात सामाजिक माध्यमांवर कार्यरत असलेल्या मुलींवर पाळत ठेवून त्यांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात योगेश गायकवाड या आरोपीने जवळपास ५७ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची घटना समोर आली आहे.

अपव्यवहाराच्या प्रकरणी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा ! – भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे

शिवसेनेचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख त्यांच्या काळात जलसंधारण खात्यातील साडेसहाशे कोटी रुपयांचा अपव्यवहार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उघडकीस आणला.

पुणे येथे बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याने गुन्हा नोंद !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण ! बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

समुदाय आरोग्य अधिकार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांवर गुन्हा नोंद करा !

समुदाय आरोग्य अधिकार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. याविषयीचे निवेदन माण पोलिसांना देण्यात आले आहे.

कोयनानगर येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याविषयी प्रस्ताव सिद्ध करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

सातारा नगरपालिकेतील निविदा प्रक्रियेमध्ये घोळ ! – नगरसेवक अविनाश कदम

निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करत चढ्या दराने स्वत:च्या ठेकेदाराला कामे दिल्याचा आरोप नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी केला आहे.

११ जुलैपासून गोकुळच्या दूध खरेदी दरात वाढ ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

म्हैशीच्या दुधाचा खरेदी दर २ रुपयांनी, तर गायीच्या दुधाचा खरेदी दर १ रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत ! – शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना निवेदन

बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले.