पुणे येथे बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याने गुन्हा नोंद !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण ! बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पुणे – मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. याविषयी सूर्यकांत घोणे यांनी तक्रार दिली असून हडपसर येथील सचिन रेवाळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोंढव्यातील एका गुन्ह्यात आरोपी अफताब पठाण याला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने १ सहस्र रुपयांचा जामीन मंजूर केला होता. त्यासाठी सचिन रेवाळे याने स्वतःच्या नावावर काहीही मालमत्ता नसतांना हडपसरमध्ये ७ गुंठे जमीन असल्याची बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. पडताळणीमध्ये ही कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंद केला आहे.