सातारा – कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याविषयी प्रस्ताव सिद्ध करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयनानगर येथे भेट दिली होती. तेव्हा या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली होती. या प्रकल्पाची सिद्धता करून सादरीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प जलद गतीने उभारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. या प्रकल्पांसाठी ८० एकर भूमी उपलब्ध आहे. ती जागा महसूल विभागाकडून गृह विभाग किंवा पोलीस महासंचालक यांच्याकडे हस्तांतरीत होण्यासाठी त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या वतीने महसूल विभागाकडे सादर करण्यात यावा. यासाठी जलद गतीने पाठपुरावा करावा.’’