शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि सरळ सेवा भरती यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणार !

महाराष्ट्र सरकारचा निर्णय !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी देश चालला असता, तर अमेरिकाही मागे पडली असती !

भाग्यनगर येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांची स्पष्टोक्ती !

लसींच्या किमतींसाठी वाटाघाटी करण्यासाठी धोरणात्मक योजना आहे का ?

राज्यांनी लसींसाठी काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ वरून सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

इस्रायलमध्ये विरोधी पक्ष आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील यामिनी पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट आणि विरोधी पक्षनेते याइर लॅपिड यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा चालू आहे.

‘ओबीसींना आरक्षण मिळवून न दिल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावबंदी करू !’ – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांमधील ओबीसींचे आरक्षण रहित झाले आहे. नागपूर येथे ‘ओबीसी आरक्षण’ रहित केल्याच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

परदेशात उच्चशिक्षणासाठी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आज विशेष लसीकरण !

परदेशातील विद्यापिठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ जून या दिवशी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट !

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

आयोग सिद्ध केला असता, तर अन्य मागासवर्गियांचे आरक्षण पुनर्स्थापित करता आले असते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते. मोर्चे काढण्याऐवजी या खटल्यात लक्ष घातले असते, तर आरक्षण टिकवता आले असते.

बुलढाणा येथे विलगीकरण कक्षाची शाळकरी मुलाकडून स्वच्छता !

कोरोनाच्या आगामी तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असतांना विलगीकरण कक्षाची मुलांकडून स्वच्छता करवून घेणे, हे प्रशासनाला लज्जास्पद  ! यासाठी अन्य कामगारांची नियुक्ती करून स्वच्छता करवून का घेतली नाही ? उद्या त्या मुलाच्या जीवावर बेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे काळाची आवश्यकता ! – केतन पाटील, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्‍या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच आज प्रत्येक हिंदु बांधवाने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे