शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि सरळ सेवा भरती यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणार !

महाराष्ट्र सरकारचा निर्णय !

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि सरळ सेवा भरती यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा शासकीय आदेशही काढण्यात आला आहे. शिक्षण आणि नोकर भरती यांमध्ये सरकारने लागू केलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्यामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही २ दिवसांपूर्वी सरकारला मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी ६ जूनपर्यंत मुदत दिली होती. या सर्वांवर मार्ग म्हणून सरकारने मराठा समाजासाठी शैक्षणिक संस्था आणि सरळ सेवा भरती यांमध्ये आरक्षण घोषित केले आहे.